किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.65° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.52°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.69°से. - 28.91°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.85°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.96°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.35°से. - 28.38°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.91°से. - 28.26°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलयोगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय,
मथुरा, १० सप्टेंबर – श्रीकृष्णाचे जन्मस्थान मानले जाणारे मथुरा-वृंदावन तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरापासून दहा किलोमीटर परिसरातील सर्व मांसविक्री आणि मद्यविक्री करणारी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कृष्ण जन्माष्टमीदिवशी या निर्णयाचे सुतोवाच केले होते. श्रीकृष्णाची जन्मभूमी हे तीर्थस्थळ म्हणून जाहीर करण्याची आपली तयारी असून, त्यासाठीचा रितसर प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आता औपचारिकता पूर्ण झाली असून, मथुरा-वृंदावन परिसर तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे.
मथुरेचा परिसर तीर्थक्षेत्र जाहीर झाल्यामुळे आता १० किलोमीटर परिसरात कुठेही मांस आणि मद्यविक्रीला परवानगी असणार नाही. या भागात सध्या अनेक मांस आणि मद्यविक्री करणारी दुकाने आहेत. या सर्व दुकानांना इतरत्र हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकार करणार पुनर्वसन
सरकारच्या या निर्णयामुळे मांस आणि मद्यविक्री करणार्या अनेकांचे नुकसान होणार आहे. मात्र, अशा सर्व व्यावसायिकांचे पुनर्वसन केले जाईल आणि कुणाचेही नुकसान होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला असून, व्यापारी याला सहकार्य करतील, अशी अपेक्षा योगी आदित्यनाथांनी व्यक्त केली आहे.