किमान तापमान : 26.37° से.
कमाल तापमान : 27.13° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 2.74 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.37° से.
24.83°से. - 28.52°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.69°से. - 28.91°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.85°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.96°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.35°से. - 28.38°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.91°से. - 28.26°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलइतरत्र टिकाव लागणार नाही, हे कळले,
ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाच्या प्रियांका टबरीवाल,
कोलकाता, १० सप्टेंबर –
नंदीग्राम मतदारसंघात दारुण पराभव झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपद टिकविण्यासाठी आपल्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघाची निवड केली. आज शुक्रवारी त्यांनी या मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. भवानीपूर या बालेकिल्ल्याशिवाय आपला इतरत्र कुठेही टिकाव लागू शकत नाही, हे त्यांना आता पुरते माहीत झाले आहे.
या मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबरला मतदान होणार आहे. नंदीग्राम मतदारसंघात पराभूत झाल्यानंतरही ममतांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पद टिकविण्यासाठी त्यांना घटनेतील तरतुदीनुसार सहा महिन्यांच्या आत विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे. त्यातच निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि ममतांना मोठा दिलासा मिळाला. भवानपूर मतदारसंघातील तृणमूल कॉंगे्रसचे आमदार सोवनदेव चटोपाध्याय यांनी खास त्यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला.
हिंसाचारविरोधात याचिका दाखल करणार्या प्रियांका टबरीवाल
भाजपाने भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांच्याविरोधात प्रियांका टबरीवाल यांना उमेदवारी दिली आहे. प्रियांका या पेशाने वकील असून, बंगालमधील निवडणुकीच्या काळात आणि निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी याचिका दाखल करणार्यांपैकी त्या एक आहेत.
ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाच्या प्रियांका टबरीवाल
पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघात होणार्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाने प्रियांका टबरीवाल यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुणसिंह यांनी आज दिल्लीत प्रियांका टबरीवाल यांच्या उमेदवारीची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये भवानीपूरसह तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, शमशेरगंजमध्ये भाजपाने मिलन घोष तर जंगीपूरमध्ये सुजित दास यांना उमेदवारी दिली आहे.
२०११ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. यावर्षी झालेल्या विधानसभासभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर सोडत नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरला होता; मात्र या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एंटली मतदारसंघात प्रियांका टिबरीवाल यांचा तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला होता.
भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी
पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीसाठी भाजपाने २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि हरदीपसिंग पुरी यांचा समावेश करण्यात आला. बिहारचे मंत्री शाहनवाज हुसैन, खा. मनोज तिवारी, बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष, शुभेंदू अधिकारी, राहुल सिन्हा, बाबुल सुप्रियो, लॉकेट चटर्जी, रूपा गांगुली, दिनेश त्रिवेदी आणि स्वपन दासगुप्ता यांचाही यादीत समावेश आहे. गत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे प्रभारी असलेल्या कैलास विजयवर्गीय यांना या यादीत स्थान मिळाले नाही.