किमान तापमान : 25.13° से.
कमाल तापमान : 25.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.13° से.
24.88°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन भोवले,
रायपूर, ५ सप्टेंबर – पोलिसांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी नुकतेच उत्तरप्रदेशात हे वक्तव्य केले होते. मी भारतातील सर्व गावकर्यांना आवाहन करतो की, ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका. त्यांना परकियांसारखी वागणूक दिली पाहिजे. मी इतर सर्व समुदायाशी देखील यासंदर्भात बोलेन, जेणेकरून आपण त्यांच्यावर बहिष्कार टाकू शकू. ब्राम्हणांना व्होल्गा नदीच्या तीरावर परत पाठवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, या देशात कायदा सर्वोच्च आहे आणि त्यांचे सरकार सर्वांसाठी आहे. कोणीही कायद्याच्या वर नाही, ती व्यक्ती माझे ८६ वर्षांचे वडील असले तरीही. छत्तीसगड सरकार प्रत्येक धर्म, पंथ, समुदाय आणि त्यांच्या भावनांचा आदर करते. माझ्या वडिलांनी एका विशिष्ट समुदायाविरोधात टिपणी केली आहे. त्यांनी सांप्रदायिक शांतता भंग केली असून, त्यांच्या वक्तव्यामुळे मलाही दु:ख झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
माझे आणि माझ्या वडिलांचे राजकीय विचार आणि विश्वास वेगळे आहेत. एक मुलगा म्हणून मी त्यांचा आदर करतो, पण मुख्यमंत्री म्हणून मी त्यांची अशी चूक माफ करू शकत नाही, ज्यामुळे राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता बिघडू शकते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.