किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.35° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलमेट्रोमॅन श्रीधरन् यांनी सुरू केला प्रचार,
पलक्कड, १५ मार्च – भाजपाचे येथील उमेदवार मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी आज सोमवारपासून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. भाजपा विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहे, असे सांगताना त्यांनी केरळमध्ये रालोआ आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
केरळातील सरकार भ्रष्टाचार, घोटाळे आणि वंशवादात गुरफटले आहे, अशी टीका त्यांनी डाव्या पक्षांवर केली. भाकपा सरकारला केरळचा विकास करण्याची इच्छा नाही. केवळ पक्षाची भरभराट करण्यावर भाकपाने लक्ष केंद्रित केले आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपाने रविवारी त्यांना पलक्कड मतदारसंघातून उमेदवारी दिल्याची घोषणा केली आहे.
पी. विजयन् पक्षासाठी चांगले मुख्यमंत्री असले, तरी ते राज्यासाठी चांगले मुख्यमंत्री नाहीत, अशी टीका त्यांनी केली. पाच वर्षांच्या काळात डाव्यांनी राज्याच्या विकासासाठी काहीही केले नाही. भाकपाच्या नेतृत्वातील सरकारने कर्नाटकमधील नानजागुड ते केरळातील निलांबूर रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी कोणतीही पाऊले उचललेली नाहीत, अशी टीका त्यांनी केली. मंजुरी मिळाल्यानंतर गुरुवायूर ते तिरुनाया दरम्यानचा रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी काहीही झाले नाही, असेही त्यांनी सांगितले. कोझीकोड आणि तिरुवनंतपुरम् येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी लाइट मेट्रो प्रकल्पाची प्राथमिक कामे राज्य सरकारने अद्याप सुरू केलेली नाहीत, अशी टीका त्यांनी केली.