किमान तापमान : 25.39° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.15 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.79° से.
24.34°से. - 28.79°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.15°से. - 28.48°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर साफ आकाशकोलकाता, १५ मार्च – उमेदवारी नाकारल्याने तृणमूल कॉंग्रेसच्या आमदार देवश्री रॉय यांनी आज सोमवारी पक्षाचा राजीनामा दिला. यापुढे मी तृलमूलचा भाग नसेल. आता या क्षणापासून मी पक्षासोबतचे संबंध संपुष्टात आणले आहे. माझा राजीनामा मी आपल्याकडे पाठविला असून, तो तत्काळ प्रभावाने मंजूर केला जावा, असे रॉय यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. यापुढे आपण काय करणार आहात, अन्य राजकीय पक्षात जाणार का, असे विचारले असता, मी अभिनेत्री असल्याने पुन्हा एकदा अभिनयावर लक्ष केंद्रित करणार आहे. याशिवाय, ठोस प्रस्ताव आल्यास इतर राजकीय पक्षातही जाण्याचा पर्याय मी खुला ठेवला आहे, असे त्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून कित्येक दिग्गज खासदार आणि आमदारांनी तृणमूल कॉंग्रेस पक्ष सोडला आहे. ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय सुवेंदू अधिकारी यांनीही मागील वर्षी डिसेंबरमध्ये तृणमूल सोडून भाजपात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य दिनेश त्रिवेदी यांनी देखील पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला.
काही नेत्यांचा भाजपात प्रवेश
दरम्यान, हल्दिया महानगर पालिकेचे माजी अध्यक्ष श्यामलाल अदाक, तृणमूलचे नगरसेवक स्वपन दास आणि सुप्रिया मैती व इतर काही नेत्यांनी आज कोलकाता येथे भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा नेते मुकुल रॉय आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.