|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.14° से.

कमाल तापमान : 26.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.99° से.

हवामानाचा अंदाज

23.94°से. - 28.01°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.34°से. - 28.79°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 29.17°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 29.06°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.74°से. - 28.87°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.62°से. - 28.2°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » पश्चिम बंगाल, राज्य » पराभव दिसताच ममतांचा चंडी पाठ : योगी आदित्यनाथ

पराभव दिसताच ममतांचा चंडी पाठ : योगी आदित्यनाथ

बलरामपूर, १६ मार्च – पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने, ममता बॅनर्जी मंदिरात जाऊन चंडी पाठ करायला लागल्या आहेत, अशी घणाघाती टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंगळवारी केली. पश्‍चिम बंगाल दौर्‍यात त्यांनी ममता बॅनर्जी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना धारेवर धरले.
ममता बॅनर्जी अलिकडे जाहीररीत्या मंदिरात जाऊन चंडी पाठ करायला लागल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर लोकांमध्ये हा बदल झाल्याचा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी देखील आजकाल निवडणुका असलेल्या राज्यातील मंदिरांना भेटी देत आहेत, पण त्यांना मंदिरात कसे बसायचे हे देखील सांगावे लागते, असे योगी म्हणाले.
पुरुलिया जिल्ह्यातील बलरामपूर येथे निवडणूक प्रचार सभेत बोलताना योगी यांनी सांगितले की, केंद्रात भाजपाची सत्ता येण्यापूर्वी हे नेते धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मंदिरात जाण्यास नाक मुरडत होते. आता ते मंदिरात जाऊन पूजा करताहेत. हा नवा भारत आहे, असेही त्यांनी सांगितले.
कॉंगेस नेते राहुल गांधी हे निवडणुकीच्या काळात एका राज्यातील मंदिरात गेले, तेव्हा त्यांना पुजार्‍यांनी नीट बसायला सांगितले.
चंडी पाठाला हिंदू परंपरेत अतिशय महत्व असून, ममता बॅनर्जी आता हा पाठ करायला लागल्यात, अशी टीका त्यांनी केली. केंेद्राच्या अनेक योजना तृणमूल कॉंग्रेसने राज्यात राबविल्या नसल्याने योगी यांनी ममता सरकारचा समाचार घेतला.
बांकुरात ममता बॅनर्जी यांचा दुर्गा पाठ!
बांकुरा – बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने निर्माण केलेले आव्हान लक्षात घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौम्य हिंदुत्वाचे धोरण स्वीकारल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बांकुरा येथे आज मंगळवारी झालेल्या प्रचारसभेत त्यांनी दुर्गा पाठ केला. बंगालमधील मतदार निश्‍चितपणे भाजपावर सूड उगवतील, असे त्यांनी या प्रचारसभेत सांगितले.
व्हिलचेअरवर बसून त्यांनी समर्थकांना शुभेच्छा दिल्या आणि दुर्गा पठणास सुरुवात केली. केंद्रीय गृहमंत्री देश चालवतील का किंवा कोणती केंद्रीय तपास यंत्रणा कुणाला अटक करेल, याचा निर्णय घेतील का, निवडणूक आयोग कोण चालवत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला. माझ्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आयोगाने हटविले. हा सर्व खेळ भाजपाच्याच इशार्‍यावरून सुरू आहे. अमित शाह यांच्या सभांना गर्दी होत नसल्यानेच, ते दुखावले गेले आहेत. कदाचित, माझी हत्या करण्याचा त्यांचा कट आहे, असा आरोपही ममता यांनी नैराश्येतून केला.
निवडणूक आयोग चालवणारे तुम्ही नसल्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना सांगितले. आम्हाला मुक्त व पारदर्शी निवडणुका हव्या आहेत. ते निवडणूक आयोगाच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांची आज सालतोरा, छतना आणि रायपूर येथेही प्रचारसभा झाली.
२८ उमेदवारांचे अर्ज फेटाळले
गुवाहाटी – आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यासाठी एकूण ४०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असूून, पडताळणीनंतर २८ उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकार्‍याच्या कार्यालयातील प्रवक्त्याने आज मंगळवारी दिली.
आसाममध्ये १ एप्रिल रोजी होणार्‍या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठी ३९ मतदारसंघांमधील ४०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी २८ उमेदवारांचे अर्ज सोमवारी झालेल्या पडताळणीनंतर फेटाळण्यात आले, असे प्रवक्त्याने सांगितले. Aया टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १७ मार्च आहे. तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यासाठी आतापर्यंत सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या टप्प्यातील निवडणूक ६ मार्च रोजी होणार आहे. यासाठी कोकराझारचे खासदार नवाकुमार सरनिया यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. तीन वेळा आमदार राहिलेले आसाम गण परिषदेचे भूपेन रॉय यांनी पश्‍चिम अभयपुरी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.
के. पलानीस्वामी, स्टॅलिन यांचा उमेदवारी अर्ज दाखल
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे समन्वयक के. पलानीस्वामी, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्यासह काही मंत्र्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पलानीस्वामी अण्णाद्रमुकने युती केलेल्या पक्षांच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी सलेम जिल्ह्यातील एडापड्डी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून त्यांनी १९८९ साली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. ते या मतदारसंघातून १९९१, २०११ आणि २०१६ साली निवडून आले आहेत.
१९८९ साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवणारे द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी थाऊजंड लाईट्‌स मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ते या मतदारसंघातून २०११ आणि २०१६ साली विजयी झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी तिरुवरूर येथे भेट दिली. त्यांचे दिवंगत वडील आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी याच मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले होते.
रंगासामी दोन मतदारसंघांतून लढणार
पुडुचेरी – ऑल इंडिया एन. आर. कॉंग्रेसचे संस्थापक आणि पुडुचेरीचे माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी थट्टांचावडी आणि यानम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
थट्टांचावडी येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी या निर्णयाची माहिती दिली. यानम मतदारसंघातून उद्या बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. एआयएनआरसीच्या स्थापनेच्या काही दिवसांनंतर २००१ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी इंदिरानगर आणि कादिरगाम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी या दोन्ही मतदारसंघांतून ते विजयी झाले होते. त्यापैकी इंदिरानगर येथील जागा कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. या मतदारसंघातून ते २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही विजयी झाले होते.
मागील पाच विधानसभा निवडणुकींमध्ये यानम मतदारसंघातून विजयी झालेले माजी आरोग्य मंत्री मल्लादी कृष्णा राव यांनी त्यांना या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे निमंत्रण दिले होते. राव यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती स्वीकारली आहे. पुडुचेरीतील विधानसभा निवडणुकीसाठी एआयएनआरसीच्या दोन, कॉंग्रेस आणि अण्णाद्रमुकच्या प्रत्येकी दोन तसेच भाजपाच्या एका उमेदवाराने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी त्यांच्या पक्षाने अद्याप अधिकृतरीत्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.

Posted by : | on : 16 Mar 2021
Filed under : पश्चिम बंगाल, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g