किमान तापमान : 24.69° से.
कमाल तापमान : 24.89° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.89° से.
24.41°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलतिरुवनंतपुरम, (२७ फेब्रुवारी ) – केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील इरिन्जादापल्ली श्री कृष्ण मंदिरात आता धार्मिक विधीसाठी खर्या हत्तीऐवजी रोबोटिक हत्ती वापरण्यात येणार आहे. हे हत्ती मंदिर समिती अभिनेत्री पार्वती थिरुवोथूसह पेटा इंडियाने सादर केले आहे. या यांत्रिक हत्तीची उंची साडे दहा फूट असून त्याचे एकूण वजन ८०० किलो आहे. या हत्तीवर चार जण स्वार होऊ शकतात. या हत्तीची सोंड, डोके, डोळे आणि कान सर्व विद्युतीय पद्धतीने चालतात. केरळच्या मंदिरांमध्ये केल्या जाणार्या धार्मिक विधींमध्ये हत्तीला खूप महत्त्व आहे. तथापि, काहीवेळा हे हत्ती विधी दरम्यान किंवा त्यापूर्वी संतप्त होतात. त्यामुळे अनेक वेळा लोकांना जीव गमवावा लागतो. या कारणास्तव, त्रिशूरच्या इरिंजदापल्ली श्रीकृष्ण मंदिर समितीने धार्मिक विधींसाठी हत्तींचा वापर न करण्याचा निर्णय घेतला होता. यावर प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणार्या पेटा इंडिया या संस्थेने हा रोबोटिक हत्ती मंदिरात सादर करण्याचा निर्णय घेतला.
मंदिरात ’नादायरुथल’ हा धार्मिक विधी पार पडला. या विधीचा भाग म्हणून देवाला हत्ती अर्पण केला जातो. पेटा इंडियाचे म्हणणे आहे की, कैदेत ठेवल्यामुळे अनेक वेळा हत्ती चिडतात. जेव्हा त्यांच्या इच्छेविरुद्ध काम केले जाते तेव्हा ते कहर करतात आणि त्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. हेरिटेज अॅनिमल टास्क फोर्सच्या अहवालानुसार केरळमध्ये गेल्या १५ वर्षांत हत्तींच्या हल्ल्यामुळे ५२६ लोकांचा मृत्यू झाला आहे. चिकट्टुकवू रामचंद्रन नावाचा हत्ती केरळच्या सणांमध्ये सर्वाधिक वापरला जातो. वृत्तानुसार, या हत्तीने सहा माहूत, चार महिला आणि इतर तीन हत्तींसह १३ जणांचा बळी घेतला आहे. यामुळेच त्रिशूरच्या इरिन्जादापल्ली श्रीकृष्णाने पूजा-उत्सवात हत्तींचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. इतर मंदिरेही असे पाऊल उचलतील, अशी आशा मंदिर समितीने व्यक्त केली आहे.