किमान तापमान : 25.35° से.
कमाल तापमान : 25.78° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.78° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलदेशभरात होळी सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर होळीच्या पाडव्याला धूलिवंदन ही तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण देशभरात धूलिवंदन साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. धूलिवंदनचा सण उत्तर प्रदेशातील मथुरा, वृंदावन, बरसाना आणि नांदगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे सांगितले जाते की, या संपूर्ण ब्रज परिसरातुन होळी सुरू झाल्याचे सांगितले जाते आणि सर्वात जास्त मजा इथल्या होळीमध्ये पाहायला मिळते. ब्रज मधला होळी मधला उत्सव एक आठवडा अगोदर सुरू होतो आणि येथील फुलांची होळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. तसेच येथील लठमार होळी देखील सर्वत्र प्रसिद्ध आहे . देश-विदेशातील लोक इथे लठमार होळी खेळायला येतात. परंपरेनुसार महिला लाठ्या वापरतात आणि पुरुष स्वतःचा बचाव करतात.जयपूरची ४०० वर्षे जुनी परंपरा असलेली ’गुलाल गोटा’ होळी प्रसिद्ध आहे. नैसर्गिक रंगांनी भरलेले लाखाचे छोटे गोल गोळे ’गुलाल गोटा’ म्हणून ओळखले जातात. हे पारंपारिकपणे जयपूरमध्ये तयार केले जातात. काही मुस्लिम कुटुंबे पिढ्यानपिढ्या या कामात गुंतलेली आहेत. रंगांनी भरलेल्या या अनोख्या लाख चेंडूंसह होळी खेळण्यासाठी जयपूर प्रसिद्ध आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, सांगितले जाते की, ४०० वर्षे आधी राजघराण्यातील सदस्य गुलाल गोट्याने होळी खेळत असत. ४-५ वर्षांपूर्वी गुलाल गोटयाची मागणी घटली होती आणि तुलनेने स्वस्त कृत्रिम रंग भरपूर असल्याने गुलाल गोटयासाठी बाजारात मोजकेच खरेदीदार होते पण आता गेल्या काही वर्षांपासून, मागणीत वाढ झाली आहे. हे गोळे लाख मटेरियलपासून बनवले जातात. लहान रंगीत लाखाच्या गोळ्यांसारख्या आकारात तयार केले जातात, जे खूप पातळ आणि पोकळ असतात. लाख गोळे नैसर्गिक रंग/गुलालाने भरलेले असतात. दुरून त्यांना मिठाई समजू शकते. पाण्याचे फुगे आणि पिचकारी यांच्या विपरीत, गुलाल गोटा रस्त्यावरून जाणार्यांवर फेकल्याने इजा होत नाही. भारतभरातील मंदिरांमध्ये, विशेषत: जयपूरच्या गोविंद देवजी मंदिर आणि मथुरा आणि वृंदावनमध्येही गुलाल मणी आपला रंग पसरवतात. हे गुलाल गोटे बनवण्याची कला खूप जुनी असली तरीही आता युवकांनी देखील मुलांनीही गेल्या काही दशकांमध्ये सुंदर लाखाचे गोळे बनवण्याची कला शिकली आहे. सणानिमित्त गुलाल गोट्याला मागणी वाढल्याने आणि अधिक ऑर्डर मिळाल्याने ते होळीच्या सुमारे दोन महिने आधी गुलाल गोट्या बनविण्यास सुरुवात करतात.
’गुलाल गोटा हे इको-फ्रेंडली आहे, कोणालाही हानी पोहोचवत नाही आणि सिंथेटिक रंगांसारखे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. गुलाल गोटा बाजारात १५० रुपयांना प्रमाणित आकाराचे ६ नग उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या आख्यायिकेनुसार, जयपूरमधील राजघराण्यातील सदस्य त्यांच्या राज्यात फिरत असत आणि ये-जा करणार्यांवर गुलाल उधळत असत. शहरात गेल्या तीनशेहून अधिक वर्षांपासून गुलाल गोटा बनविण्याचे काम सुरू आहे.सिंथेटिक रंगांच्या तुलनेत गुलाल गोटा थोडा महाग असतो.