किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादललखनौ, (२७ फेब्रुवारी ) – ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गांद्वारे उत्तरप्रदेशच्या विकासाचा मार्ग सुकर करताना, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी बलिया येथे ६५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून तयार झालेल्या सात राष्ट्रीय महामार्गांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि काही प्रकल्पांचा शिलान्यास केला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री जितीन प्रसाद, दयाशंकरसिंह, दानिश अन्सारी, बलियाचे खासदार वीरेंद्रसिंह उपस्थित होते. बलिया लिंक एक्सप्रेस-वे तयार झाल्यानंतर लखनौ ते पाटणा हा प्रवास केवळ साडेचार तासांचा होणार आहे. याशिवाय, बलिया ते बक्सरचा प्रवास अर्ध्या तासाचा, छपरापर्यंतचा प्रवास एक तासाचा आणि बलिया ते पाटणा हा प्रवास दीड तासांचा होणार आहे. बलिया येथील शेतकर्यांचा भाजीपाला लखनौ, वाराणसी आणि पाटणा येथील बाजारपेठांमध्ये सहजपणे पोहोचू शकणार आहे. यामुळे शेतकर्यांच्या नफ्यातही वाढ होणार आहे.
चंदौली ते मोहनिया या १३० कोटी रुपयांच्या ग्रीनफील्ड मार्गामुळे उत्तरप्रदेशातील चंदौली आणि पाटण्यातील कैमूर जिल्हा थेट दिल्ली व कोलकाता जीटी मार्गाशी जोडला जाणार आहे. यामुळे या भागातील जनतेची आर्थिक आणि सामाजिक प्रगती होणार आहे.