किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.7°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश-सरकारला धोका नसल्याचा सोरेन यांचा दावा,
नवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी) – झारखंडमध्ये मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नेतृत्वातील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारमध्ये एकही मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचे वृत्त आहे. नाराज असलेल्या १२ आमदारांपैकी आठ जणांनी शनिवारी सायंकाळी थेट दिल्ली गाठल्याचे सांगितले जात आहे. आम्ही दिल्लीला आलो आहोत. उर्वरित आमदार लवकरच पोहोचतील. आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वासोबत चर्चा करणार आहोत, असे आमदार कुमार जयमंगल यांनी सांगितले.
आमदार नाराज असल्याचे वृत्त असताना चंपई सोरेन यांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. सरकार स्थापन केल्यानंतर मी प्रथमच दिल्लीत आलो. शिष्टाचार म्हणून खरगे यांची भेट घेतली, असे सोरेन यांनी सांगितले. झारखंडमधील आघाडी मजबूत आहे आणि राज्यातील सरकारला कोणताही धोका नाही. खातेवाटपाच्या मुद्यावर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसमध्ये मतभेद वाढल्याच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, खातेवाटपावरून नाराजी हा मुद्दाच नाही, आमची आघाडी मजबूत आहे. नाराज आमदारांच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवला जाईल. या मुद्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही.