किमान तापमान : 27.88° से.
कमाल तापमान : 29.29° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 42 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.29° से.
25.84°से. - 30.87°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर घनघोर बादल27.21°से. - 30.97°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
रविवार, 17 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन,
पुणे, (१२ फेब्रुवारी) – भक्ती आणि शक्तीच्या संगमामुळेच ५०० वर्षांच्या गुलामगिरीची गाथा मोडून अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी झाली, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केले. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सवात बोलताना आदित्यनाथ यांनी मुगल सम्राट औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान केले.
आदित्यनाथ म्हणाले की, आज शक्ती आणि भक्ती एकमेकांना भेटत आहेत. भक्ती आणि शक्तीच्या संगमामुळे ५०० वर्षांच्या गुलामगिरीची गाथा मोडून अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी झाली. तो अभूतपूर्व क्षण पाहण्याची संधी आम्हाला मिळाली. महाराष्ट्रातील लोक भाग्यवान आहेत कारण त्यांना गेल्या शेकडो वर्षांपासून संतांचा आशीर्वाद मिळत आहे. भक्तीतून निर्माण झालेली ही शक्ती शत्रूंना हरवत आहे. समर्थ रामदासांनी याच भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांची निर्मिती केली होती. त्यांनी मुगल सम्राट औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान दिले. संतांच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्र्र ही शौर्याची भूमी आहे, असे गौरवोद्गार आदित्यनाथ यांनी काढले.