किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.98° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.76°से. - 27.41°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल25.27°से. - 27.79°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.16°से. - 28.5°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.9°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.58°से. - 28.05°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.41°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादलनलगोंडा, (२५ डिसेंबर) – तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा दोन वेगवेगळे रस्ते अपघात झाले. या दोन घटनांमध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान, अन्य दोन जण जखमी झाले आहेत. निदामनूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक (एसआय) गोपाल राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत मोटारसायकल आणि पादचार्याची धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यात पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयात उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
दुसर्या घटनेत सात जणांना घेऊन जाणार्या ऑटोरिक्षाची वेमपाडू बसस्थानकावर उभ्या असलेल्या जीपला धडक बसली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नातेवाईकाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जात असताना सोमवारी धुक्यामुळे त्यांच्या वाहनाची जीपला धडक बसल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस अधिकार्याने पुढे माहिती दिली की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जखमींवर नलगोंडा येथील मिर्यालागुडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. विशेष म्हणजे मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.