किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशजयपूर, (१८ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १८ नोव्हेंबर २०२३ रोजी निवडणूक राज्य राजस्थानला भेट देणार आहेत. नागौर आणि भरतपूर येथे पंतप्रधान मोदी जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज तेलंगणा राज्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या निवडणूक दौर्यावर आहेत. भाजपच्या विजय संकल्प सभेसाठी पंतप्रधान मोदी सकाळी ११.४५ वाजता भरतपूरच्या एम.एस. जे कॉलेजमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. पीएम मोदींचा दुसरा कार्यक्रम नागौर खरनाल येथे आहे. येथे ते दुपारी ३.१५ वाजता वीर तेजाजी मंदिरात दर्शनासाठी जातील. मोदींचा तिसरा कार्यक्रम नागौर जिल्हा क्रीडा स्टेडियमवर आहे, मोदी येथे ४:१५ वाजता विजय संकल्प सभेला उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज त्यांच्या तेलंगणा दौर्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात अमित शाह जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. , जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर अमित शाह गडवाल येथे जातील आणि दुपारी १२.४५ ते १.२० या वेळेत सभेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी ०२.३० वाजता अमित शाह नलगोंडा येथे जाहीर सभा घेणार आहेत. यानंतर अमित शाह दुपारी ४ वाजता वारंगलमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करतील. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही आज राजस्थान दौर्यावर असणार आहेत. जेपी नड्डा पहिला कार्यक्रम जैन मॅरेज गार्डन, बिलारा, जोधपूर येथे सकाळी ११:१० वाजता आहे. येथे ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. जेपी नड्डा यांचा दुसरा कार्यक्रम ओसियन, जोधपूर येथे दुपारी १२.४० वाजता आहे. तिसरी जाहीर सभा जैसलमेरमध्ये दुपारी ०३.०५ वा.