किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशलखनऊ, (०५ मार्च) – यूपी पोलीस भरती परीक्षा लीक प्रकरणी योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. यूपी पोलीस भरती बोर्डाच्या अध्यक्षांना हटवण्यात आले आहे. रिक्रूटमेंट बोर्डाच्या अध्यक्षा रेणुका मिश्रा यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता राजवी कृष्णा यांच्याकडे भरती मंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सरकारने पोलीस भरती मंडळाच्या अध्यक्षा रेणुका मिश्रा यांना हटवून त्यांना प्रतीक्षा यादीत टाकले आहे. १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी राजीव कृष्णा यांना आता भरती मंडळाची अतिरिक्त जबाबदारी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ६०,००० हून अधिक कॉन्स्टेबल भरती पदांसाठी ४८ लाखांहून अधिक उमेदवारांनी भाग घेतला होता. पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यूपी एसटीएफने यूपीच्या सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या कॉन्स्टेबल भरतीच्या लेखी परीक्षेत पेपर फुटल्याप्रकरणी आणखी दोन आरोपींना २ मार्च रोजी अटक केली आहे. एसटीएफने त्यांच्याकडून प्रवेशपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी विभूतीखंड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रयागराज येथील अजय सिंग आणि सोनू सिंग यादव यांचा समावेश आहे.
कॉन्स्टेबल भरती परीक्षेत राज्यातील सुमारे ५० लाख तरुणांनी सहभाग घेतला होता. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करून सहा महिन्यांत पुन्हा परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. १ मार्च रोजी एसटीएफने लोणीच्या पुश्ता पोलिस चौकीजवळील बेगमाबाद गढी बागपत गावात राहणारा कपिल तोमर याला अटक केली होती.