किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.33° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.24°से. - 27.77°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.63°से. - 28.19°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.58°से. - 28.88°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.85°से. - 29.25°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.36°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.83°से. - 29.02°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल– ’माझा देश हे माझे कुटुंब’ असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला पुनरुच्चार,
हैदराबाद, (०५ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील संगारेड्डी येथे जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आणि ’माझा देश हे माझे कुटुंब’ असल्याचा पुनरुच्चार केला. विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी कुटुंब प्रथम आहे, तर माझ्यासाठी देश प्रथम आहे. त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंबही सर्वस्व आहे. माझ्यासाठी देशातील प्रत्येक कुटुंब सर्वकाही आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या हितासाठी देशहिताचा त्याग केला. तर मोदींनी राष्ट्रहितासाठी स्वतःला समर्पित केले आहे.
संगारेड्डी येथे पीएम मोदी म्हणाले, आज १४० कोटी देशवासी विकसित भारत घडवण्याचा संकल्प करत आहेत. आणि विकसित भारतासाठी आधुनिक पायाभूत सुविधा असणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी रुपये दिले आहेत. तेलंगणाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा, असा आमचा प्रयत्न आहे. पंतप्रधान असेही म्हणाले की, ’आपण मिळून भारताला संपूर्ण जगात नवीन उंचीवर नेऊ. आज तुम्ही पहात आहात की संपूर्ण जगात भारत आशेचा किरण बनून नवीन उंची गाठत आहे.
पीएम मोदी म्हणाले, ’आम्ही जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० संपवण्याबाबत बोललो होतो. भाजपने हे आश्वासन पूर्ण केले. आम्ही अयोध्येतील भव्य मंदिरात रामाचे एकत्र स्वागत करू असे सांगितले होते. हे आश्वासन पूर्ण झाले. आज आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिलेली हमी पूर्ण करण्यात व्यस्त असताना काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आम्हाला शिव्या देण्यास उतरले आहेत. याचे कारण आम्ही त्यांचे लाखो रुपयांचे घोटाळे उघड करत आहोत. मोदी म्हणाले, मी घराणेशाहीला विरोध करतो, घराणेशाही लोकशाहीला धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेस आणि बीएसआर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून ते म्हणाले, ’बीआरएस असो की काँग्रेस, दोन्ही एकच पक्ष आहेत. बीआरएस आणि काँग्रेसमध्ये युती आहे की नाही हे तेलंगणातील जनताच सांगेल. पण देशाला माहीत आहे की बीआरएस आणि काँग्रेस यांच्यातील घोटाळ्याचे बंधन खूप मजबूत आहे. ते दोघेही घोटाळ्याच्या बंधनात म्हणजे तेलंगणाच्या लुटीत एकमेकांना झाकून घेत आहे.