किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकोलकाता, (२७ सप्टेंबर) – केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने पश्चिम बंगालमधील किरीटेश्वरी गावाची नुकतीच भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून निवड केली आहे. शक्तिपीठ असणार्या किरीटेश्वरी देवीच्या मंदिरावरूच या गावाला हे नाव देण्यात आले. प्राचीन मंदिराशेजारी इतर अनेक नवीन मंदिरांचे गावात सहअस्तित्व आहे. सुमारे एक हजार वर्षे प्राचीन असलेल्या मंदिराच्या अवशेषाशेजारी उभे असलेले लाल व पांढर्या रंगाचे तुलनेने नवीन मंदिर. या मंदिरात हिंदूंधर्मीयांच्या पूजाविधीत सक्रिय सहभाग घेणारे मुस्लिमधर्मीय. मंदिराचे बौद्ध, मुस्लिम आणि हिंदू स्थापत्य शैलीतील जणू सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे छत, असे या गावातील सुखद चित्र आहे.
किरीटकोन म्हणूनही ओळखले जाणारे हे गाव प. बंगालमधील बेहरामपूर जिल्ह्यात असून, जिल्हा मुख्यालयापासून २० कि.मी. अंतरावर आहे. केवळ १२०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या या खेड्याचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. देशात अनेक ठिकाणी जातीय, धार्मिक तणाव निर्माण होत असताना या चिमुकल्या गावाने मात्र सलो‘याचा आदर्श उभा केला आहे.
किरीटेश्वरी मंदिर समितीमध्ये मुस्लिम समुदायातील व्यक्तीही आहेत. एवढेच नाही तर, त्या व्यक्ती हिंदूधर्मीयांच्या धार्मिक विधीतही सक्रियपणे सहभाग घेतात. मंदिराचा भाग असलेल्या जमिनीचा तुकडाही मुस्लिमांनी हिंदूंना दिला. मंदिर समितीचे सदस्य सिराजूल इस्लाम म्हणाले, की माझ्या आजोबांनी त्यांच्या इच्छेनुसार जमिनीचा तुकडा मंदिरासाठी दिला. त्याच्याशी संबंधित कागदोपत्री व्यवहार दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आला. दरवर्षी गावात दुर्गापूजेदरम्यान अष्टमीदिवशी भव्य मेजवानीचे आयोजन केले जाते. यात बहुसं‘य मुस्लिमांसह सुमारे सात ते आठ हजार जण सहभागी होतात, असेही त्यांनी नमूद केले.