किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशबंगळुरू, (०२ मार्च) – बंगळुरूच्या एका कॅफेमध्ये शुक्रवारी कमी तीव्रतेच्या झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी शनिवारी दिली. या प्रकरणाचा तपास करणार्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने धारवाड, हुबळी आणि बंगळुरू येथून चार जणांना उचलले. आयईडीमुळे रामेश्वरम् कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या स्फोटात दहा जण जखमी झाले. या प्रकरणाची चौकशी वेगात केली जात आहे, असे बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले. आम्हाला प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या माहितीवर काही पथके काम करीत आहेत.
या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता माध्यमांनी अंदाज वर्तवणारी वृत्ते देऊ नये आणि सहकार्य करावे, असे दयानंद यांनी सांगितले होते. दरम्यान, पूर्व बंगळुरूमधील आयटी कॉरिडॉर समजल्या जाणार्या भागात झालेल्या स्फोटानंतर राज्यातील विशेषतः केम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली. या स्फोट प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, स्फोटके कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
स्फोट घडवणार्यांना लवकर अटक करू : सिद्धरामय्या
बंगळुरूतील स्फोटानंतर बॉम्बस्फोट यांनी गृहविभागाची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कॅफेमध्ये स्फोट घडविणार्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेर्यांत कैद झाल्या असल्याने त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.