किमान तापमान : 26.73° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 3.19 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.55°से. - 27.39°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलममतांनी घेतला ‘मोकळा’ श्वास,
नवी दिल्ली, ४ सप्टेंबर – निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील भवानीपूरसह चार विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोरील घटनात्मक पेचप्रसंग संपुष्टात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना ज्या कारणासाठी राजीनामा द्यावा, तशी स्थिती आपल्यावर ओढवणार नसल्याने ममतांना मोठा दिलासा मिळाला.
भवानीपूर, शमशेरगंज आणि जंगीपूर या बंगालमधील तर ओडिशातील पीपली अशा चार विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ३० सप्टेंबरला या मतदारसंघांत पोटनिवडणूक होणार असून, ३ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघात भाजपाचे शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. आमदार म्हणून पराभूत झाल्यानंतरही बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. १० मे रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांना ६ महिन्यांच्या आत म्हणजे ९ नोव्हेंबरपर्यंत विधानसभेवर निवडून येणे आवश्यक होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोग पोटनिवडणूक घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे बॅनर्जी यांच्यासमोर घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती उद्भण्याची शक्यता निर्माण झाली होती. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशातील अन्य ३१ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा कार्यक्रम मात्र निवडणूक आयोगाने स्थगित केला.