किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलश्रीनगर, २ सप्टेंबर – काश्मीरमधील फुटिरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सचा संस्थापक सदस्य सय्यद अली शाह गिलानी यांचे ९२ व्या वर्षी बुधवारी रात्री येथे निधन झाले. आज गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आला.
गिलानींच्या निधनानंतर काश्मीर खोर्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली. गिलानींचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ रोजी बारामुल्ला जिल्ह्यात झाला. मात्र, ते स्वत:ला भारतीय मानत नव्हते. गिलानी आधी जमात-ए-इस्लामी काश्मीरचा सदस्य होता. नंतर तहरिक-ए-हुर्रियत नावाचा पक्ष स्थापन केला.
इम्रान खान यांचे वादग्रस्त ट्विट
गिलानींच्या निधनानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. काश्मिरी नेता सय्यद अली शाह गिलानींच्या निधनाचे दु:ख झाले. गिलानी यांनी आयुष्यभर आपल्या लोकांसाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला. भारताने त्यांना कैदेत ठेवले आणि छळ केला, असा आरोप इम्रान खान यांनी ट्विट करीत केला. पाकिस्तान त्यांच्या संघर्षाला सलाम करीत असून, आम्ही पाकिस्तानी आहोत, पाकिस्तान आमचा आहे, हे त्यांचे शब्द स्मरणात राहतील, असेही खान यांनी म्हटले. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्याची घोषणा करीत एक दिवसाचा दुखवटाही जाहीर केला.
गिलानींची वादग्रस्त पृष्ठभूमी
सय्यद अली शाह गिलानींचा जन्म जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये झाला असला, तरी ते स्वतःला भारतीय मानायचे नाही. पासपोर्टसाठी अर्ज दिला असताना त्यांनी राष्ट्रीयतेचा रकाना रिकामा सोडला होता. मी जन्माने भारतीय नाही. काश्मीरचा ताबा घेण्यात आला आहे, असे त्यांनी नंतर माध्यमांना सांगितले होते.
अमरनाथ मंडळाला जमीन देण्यास विरोध
अमरनाथ येथे येणार्या भाविकांसाठी अस्थायी निवास उभारण्याचा निर्णय केंद्र आणि जम्मू-काश्मीर सरकारने २००८ मध्ये घेतला होता. यासाठी सरकारची ९९ एकर जमीन अमरनाथ मंदिर विश्वस्त मंडळाला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला गिलानींने विरोध केला. नंतर अमरनाथ मंदिर विश्वस्त मंडळाला ४० हेक्टर जमीन आवंटित करण्यात आली.