किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – ’आप’ने (आम आदमी पार्टी) भाजपवर आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी २५ कोटी रुपये आमदारांना देऊ केले आहेत. याविरोधात भाजपने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यामुळे ’आप’च अडचणीत सापडली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. मुख्यमंत्र्यांना नोटीस देण्यासाठी पोलीस अधिकारी आले आहेत. हे प्रकरण ’आप’ने भाजपवर आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पोलिस दुसर्यांदा नोटीस घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी आले आहेत.
याआधी शुक्रवारी क्राइम ब्रँचचे पथक केजरीवाल आणि दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांच्या घरी गेले होते, परंतु त्यांना नोटीस घेण्यास नकार देण्यात आला होता. यानंतर पोलिसांचे पथक शनिवारी पुन्हा नोटीस घेऊन आले. भाजपने आपल्या सात आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप ’आप’ने गेल्या आठवड्यात केला होता. हे पैसे ’आप’च्या आमदारांना पक्ष सोडण्यासाठी देण्यात येणार होते. भाजप दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ’आप’ने केला होता. अरविंद केजरीवाल यांनी एक्स वर पोस्ट करून यासंदर्भात आरोप केले होते.
दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, भाजपने ऑपरेशन लोटस २.० लाँच केले आहे. गतवर्षीही त्यांनी आमदार खरेदीचा असाच प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी झाला नव्हता. २०२२ मध्ये भाजपने आपच्या आमदारांना पक्षात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला होता. ’आप’च्या आरोपानंतर दिल्ली भाजपचे प्रमुख विजेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली भाजपचे शिष्टमंडळ ३० जानेवारी रोजी पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना भेटायला गेले होते. भाजप नेत्यांनी आप विरोधात तक्रार दाखल केली होती आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. पोलिस मुख्यालयात पोलिस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर सचदेवा म्हणाले होते की, केजरीवाल त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करतात, पण ’आप’चे कोणीही पुरावे घेऊन पुढे येत नाही. यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेत्यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे दिसून आले.