किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२१ डिसेंबर) – भारतीय जनता पक्षाने (भाजप) प्रथमच आमदार किरण सिंह देव यांची छत्तीसगडचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ते नुकतेच उपमुख्यमंत्री बनलेल्या अरुण साव यांची जागा घेतील. किरण सिंह देव पहिल्यांदाच जगदलपूरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपने आज गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आमदार किरण सिंह देव यांची छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू होईल. किरण सिंह देव हे जगदलपूर महानगरपालिकेचे महापौर राहिले आहेत. भाजप युवा मोर्चातून राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे किरण सिंह देव हे बस्तर जिल्ह्याचे अध्यक्ष राहिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संसदेचे हिवाळी अधिवेशन संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांचा दौरा सुरू करणार आहेत. पंतप्रधान मोदी दोन ते तीन दिवस प्रत्येक राज्याचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या अधिकृत दौर्यांदरम्यान, विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीचा कार्यक्रम आहे, ते लोकांमध्ये जाऊन मोठ्या जाहीर सभाही घेणार आहेत. त्या जागांसाठीच्या उमेदवारांची यादी वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर करण्याची भारतीय जनता पक्षाची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्ष त्या १६० लोकसभा जागांसाठी जानेवारी महिन्यात उमेदवारांची नावे जाहीर करू शकतो, ज्या कमकुवत जागांच्या श्रेणीत येतात किंवा गेल्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला होता. पक्षाने अशा १६० जागा ओळखल्या आहेत. या जागांवर पक्ष गेल्या २ वर्षांपासून काम करत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही भारतीय जनता पक्षाने निवडणूक वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच कमकुवत जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली होती, त्याचाही निवडणुकीत पक्षाला फायदा झाला. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी दुर्बल प्रवर्गातील अनेक जागा जिंकल्या.