किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– छत्तीसगड मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी पंतप्रधान मोदींची पहिली हमी केली पूर्ण,
रायपूर, (१४ डिसेंबर) – छत्तीसगडमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आज गुरुवारी मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत छत्तीसगडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १८ लाख घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भाजपचे सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात १८ लाख घरे बांधण्यास मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन आम्ही निवडणुकीत जनतेला दिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही हमी छत्तीसगडच्या जनतेला दिली असल्याचे ते म्हणाले. आम्ही पंतप्रधान मोदींची पहिली हमी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जनतेने भरलेल्या फॉर्मबद्दल विचारले असता, उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले की, आमच्याकडे ७ लाख फॉर्म आहेत. १८ लाख घरे बांधण्याची प्रक्रिया आम्ही पुढे नेली आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित लाभार्थ्यांची घरेही बांधण्यात येणार आहेत.