किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– शिवराज पुन्हा झाले भावुक!
भोपाळ, (१५ डिसेंबर) – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान विदिशा दौर्यावर असताना त्यांच्या महिला समर्थकांनी त्यांना घेरले आणि त्यांना मिठी मारली. चौहान भोपाळपासून ५५ किमी अंतरावर असलेल्या विदिशा येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जात असताना महिलांनी त्यांना घेरले आणि त्यांच्या स्तुतीसाठी घोषणाबाजी केली. चौहान यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. माजी मुख्यमंत्र्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि आपण मध्य प्रदेश सोडत नसल्याचे आश्वासन दिले.
राज्यात १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकूण २३० जागांपैकी १६३ जागा जिंकून नेत्रदीपक विजय संपादन केला. यानंतर भाजपने उज्जैन येथील मंदिराच्या शहरातून तीन वेळा आमदार राहिलेले मोहन यादव यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड केली. सुमारे दोन दशके मध्य प्रदेशच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणार्या चौहान यांनी ११ डिसेंबर रोजी यादव यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि चौहान युगाचा अंत झाला. चौहान (६४) यांनी या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत सिहोर जिल्ह्यातील बुधनी येथून विक्रमी एक लाख मतांनी विजय मिळवला.