किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– शिवराजसिंह चौहान यांचा विश्वास,
भोपाळ, (०४ मार्च) – भाजपा आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मध्यप्रदेशातील सर्व २९ जागा जिंकेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. चौहान यांना विदिशा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशातील लोकांच्या हृदयात आहेत. भाजपा सर्व २९ जागा जिंकेल. आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवू, असे चौहान यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांना सांगितले. फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पारचा नारा त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्यासह भाजपा नेत्यांनी निवडणुकीतील विजय सुनिश्चित करण्यासाठी चर्चा केली. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी पूर्ण ताकदीने काम करेन, असे ते म्हणाले. २००५ मध्ये मुख्यमंत्री होण्यापूर्वी चौहान यांनी पाच वेळा विदिशा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. या मतदारसंघाचे यापूर्वी भाजपाचे दिग्गज दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (१९९१), सुषमा स्वराज (२००९ व २०१४) आणि वृत्तपत्र प्रकाशक रामनाथ गोएनका (१९७१) यांनी प्रतिनिधित्व केले होते.