किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलयादगिरी, (०५ मार्च) – कर्नाटकमध्ये एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात राहणार्या एका व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आरोपीने धमकी दिली आहे की, केंद्रात काँग्रेसचे सरकार आले तर तो पंतप्रधान मोदींना मारून टाकेल. व्हिडिओमध्ये आरोपी तलवारही फिरवताना दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ५०५(१), २५(१)(बी) अन्वये आयपीसी आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हैदराबाद, यादगिरी जिल्ह्यात पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे.
पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एनआयएला धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या ईमेलमध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम उडवून देण्याची धमकीही देण्यात आली होती. गेल्या वर्षी जुलैमध्येही देवरिया, यूपी येथील एका व्यक्तीने पीएम मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपींने यूपीच्या ११२ हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून ही धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.