किमान तापमान : ° से.
कमाल तापमान : ° से.
तापमान विवरण :
आद्रता : %
वायू वेग : मी. प्रतिसेकंद
स्थळ : ,
° से.
– मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सहकार्याने सोडला हात,
जयपूर, (१० नोव्हेंबर) – राजस्थान विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे जवळ सहकारी तसेच जोधपूरचे माजी महापौर रामेश्वर दधिच यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय अन्य काही पक्ष आणि संघटनांच्या कार्यकत्र्यांनी सुद्धा भाजपाला जवळ केले आहे.
रामेश्वर दधिच यांनी सुरसागर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा काँग्रेस नेतृत्वाकडे व्यक्त केली होती. परंतु, याठिकाणी शहजाद खान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे नाराज होत त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला होता. गुरुवारी त्यांनी निवडणूक मैदानातून माघार घेत मुख्यमंत्री गहलोत यांनी आपल्या राजकीय हितासाठी मुस्लिम नेत्याला उमेदवारी दिल्याचा आरोप केला. यानंतर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सोबत दौसा येथील काँग्रेस नेता विनोद शर्मा यांच्यासह अन्य स्थानिक पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्ते सुद्धा भाजपात दाखल झाले.
गिर्राज सिंह मुलगा सुद्धा …
ऐन निवडणूक प्रचाराच्या दिवसांत भाजपा नेत्यांना अन्य पक्ष आणि संघटनातून येणा्यांचे स्वागत करावे लागत आहे. ६ नोव्हेंबरला बारी येथील काँग्रेस आमदार गिर्राज सिंह मुलगा भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाले होते. पक्षातील एकेका नेत्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी राज्य काँग्रेस नेत्यांवर केला होता. दरम्यान, राज्यात २३० मतदारसंघात २५ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होत असून, मोजणी ३ डिसेंबरला नियोजित आहे.