किमान तापमान : 23.25° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.25° से.
22.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल– होळी कारागृहातच जाणार,
नवी दिल्ली, (४ मार्च) – दिल्लीतील बहुचर्चित उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सोमवारपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने शनिवारी दिला. सिसोदिया यांच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने केली होती. चार दिवसांची कोठडी संपल्यानंतर सिसोदिया यांना न्यायालयात हजर केले. सिसोदिया चौकशीत सहकार्य करीत नसल्याने त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने केली.
यावर सिसोदिया यांच्या वकिलाने आक्षेप घेतला. सहकार्य न करणे हा कोठडी मागण्याचा आधार ठरू शकत नाही, त्यावेळी सीबीआय मुख्यालयाबाहेर केंद्रीय राखीव पोलिस दल अर्थात् सीआरपीएफच्या शीघ‘ कृती दलाला तैनात करण्यात आले होते. सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध करून आपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आजही दिल्लीत निदर्शने केली. सीबीआय स्वतःला हवा तसा जबाब घेण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रकरणी आपण पहिल्या दिवशी होतो, तिथेच आज आहोत, असा दावा त्यांच्या वकिलाने केला. यावेळी त्यांनी जामिनासाठी दिलेल्या अर्जाची माहिती दिली. सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने १० मार्च रोजी सुनावणी ठेवली.