किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल,
नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता महिलाही असू शकतात, असा महत्त्वाचा निकाल उच्च न्यायालयाच्या न्या. सुरेश कुमार कैत आणि न्या. नीला बन्सल कृष्ण यांच्या खंणपीठाने दिला आहे.
कोणताही कायदा कींवा कोणत्याही पारंपरिक हिंदू कायद्यांनी महिलेला ‘कर्ता’ होण्यापासून रोखलेले नाही. जे अधिकार कायदा देतो, ते अधिकार सामाजिक दृष्टिकोन सांगतो म्हणून नकारता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता कोण, या संदर्भातील एका कुटुंबाचा वाद न्यायालयात गेला होता. या खटल्यात न्यायालयाने हा निकाल दिला. २००५ मध्ये हिंदू वारसा कायदा १९५६ मध्ये बदल करण्यात आले. त्यानुसार मुलींना वडिलापार्जित मालमत्तेत समान वाटणी देण्यात आली. कायद्यातील या बदलामुळे महिला मालमत्तेतील संयुक्त वारस बनल्या. म्हणजे महिला संयुक्त वारस ठरू शकतात, पण कर्ता ठरत नाहीत, असा कायद्यातील बदलांचा अर्थ लावणे म्हणजे मूळ उद्देशाला बगल देण्यासारखे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
एका अविभाजित हिंदू कुटुंबाशी संबंधित हा खटला आहे. एका व्यक्तीला पाच मुले होती. शेवटच्या मुलाचे निधन २००६ मध्ये झाले. त्यानंतर त्यांच्या वारसांमध्ये अविभाजित कुटुंबातील कर्ता कोण, असा वाद सुरू होता. या नातवंडात सर्वांत मोठी मुलगी होती. या मुलीला कर्ता करण्यात काही भावंडांचा विरोध होता. या वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला होता.