किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– चांद्रयान मोहिमेच्या प्रमुखांची माहिती,
उधममंडलम्, (१० फेब्रुवारी) – २०३५ पर्यंत स्वतःचे अंतराळ केंद्र आणि २०४० पर्यंत अंतराळवीराला अंतराळात पाठविण्याच्या देशाच्या महत्त्वाकांक्षी योजना योग्य मार्गावर आहेत, अशी माहिती चांद्रयान-३ चे प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल यांनी शनिवारी दिली. २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर जाईल आणि २०३५ पर्यंत भारताचे अंतराळ केंद्र उभारले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोच्या अध्यक्षांनी अगोदरच सांगितले आहे. इस्रोने हाती घेतलेल्या या दोन्ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत आणि आम्ही यावर काम करीत आहोत, असे वीरामुथुवेल यांनी सांगितले.
चांद्रयान-३ यानाचे प्रोपल्शन मोड्युल यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत आणण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, चांद्रयान-३ मोहिमेचा विचार कराल, तर एका चांद्र दिवसात लॅण्डर आणि रोव्हरची मोहीम यशस्वी ठरली आहे. आम्ही हॉप ऑन प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केला. ज्यात आम्ही तेच इंजिन वापरून लॅण्डिंग केले आणि पुन्हा एक पृथ्वी दिवसासाठी पेलोड्सचे संचालन केले. चंद्राच्या कक्षेत ठेवण्यासाठी वापरलेल्या प्रोपल्शन मोड्युलने मोहिमेसाठी ठेवलेली सर्वच उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. प्रोपल्शन मोड्युलमध्ये काही इंधन बाकी असल्याने आम्ही ते पृथ्वीच्या कक्षेत आणू शकलो. चंद्राच्या कक्षेतून ते यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत आणून आम्ही आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले, असे वीरामुथुवेली यांनी सांगितले.