किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– ८५ हजार कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन,
अयोध्या, (०६ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी केवळ श्रीरामच नव्हे, तर अयोध्यानगरीत ‘लक्ष्मी’देखील अवतरणार आहे. अयोध्येच्या विकासासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला असून, १० वर्षांत तो पूर्णत्वास जाईल आणि अयोध्येच्या पुनर्विकासावर ८५ हजार कोटी रुपये खर्च केले जातील.
अयोध्येतील राम मंदिर हे देशातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र तर आहेच, शिवाय या प्रदेशाच्या विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठीही ते विशेष आहे. राम मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. यामुळेच पायाभूत सुविधांपासून ते हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी क्षेत्रापर्यंतच्या कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या नवीन रेल्वे स्टेशन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणासाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी अयोध्या क्षेत्रासाठी १५ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे अयोध्येला आधुनिक स्वरूप प्राप्त होईल.
केंद्र-राज्याच्या ३७ एजन्सी अयोध्येत
केंद्र आणि राज्य सरकारच्या ३७ एजन्सी अयोध्येला नवे रूप देण्यासाठी आधीच कार्यरत आहेत. यासाठी सुमारे ३१,६६० कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण १०,००० कोटी रुपयांचे प्रकल्प हाताळत आहे. उत्तरप्रदेश सरकार आधीच ७५ हजार कोटी रुपयांच्या सुमारे ३४ प्रकल्पांवर काम करीत आहे. विमानतळ, रेल्वे आणि महामार्गाचा विकास स्वतंत्रपणे होत आहे.
व्यवसायातही भरभराट
श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा सांगतात की, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आजूबाजूच्या भागात आर्थिक घडामोडी वाढतील. यामुळे व्यवसायापासून रोजगारापर्यंतच्या संधी वाढतील. ताज, रॅडिसन आणि आयटीसी सारखे लक्झरी ब्रॅण्ड अयोध्येत हॉटेल्स येत आहेत, तर ओयोसारखे बजेट हॉटेल ब्रॅण्ड्सही येथे पोहोचले आहेत. बिसलेरी, पार्ले आणि कोका-कोला या कंपन्याही या भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात प्रकल्प उभारण्यावर भर देत आहेत.