किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– मला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले,
नवी दिल्ली, (०६ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान मानत नाही, संसदेत आम्हाला बोलू दिले जात नाही. या अन्यायाच्या विरोधात राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी आज स्पष्ट केले.
१४ जानेवारीला प्रारंभ होणाऱ्या राहुल गांधी यांच्या पूर्व ते पश्चिम अशा भारत जोडो न्याय यात्रेच्या लोगोचे आणि घोषणेचे काँग्रेस मुख्यालयात लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी खडगे बोलत होते. मोदींसाठी संविधानपेक्षा नागपूरचा आदेश महत्त्वाचा आहे, त्यामुळे नागपुरातून येणाऱ्या आदेशाचे पालन ते संविधानाप्रमाणे करतात, असे ते म्हणाले.
मनमानी पद्धतीने मोदी सरकार जुने कायदे रद्द करीत आहे आणि हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे आम्ही संसदेत उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला बोलू दिले जात नाही. विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करण्यात आले, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. मोदी संसदेत येत नाही, यावेळी तर फार कमी वेळा ते लोकसभेत आले. राज्यसभेकडे तर ते फिरकलेच नाही. हा अन्याय आहे, या अन्यायाच्या विरोधातच भारत जोडो न्याय यात्रा आहे, या अन्यायाला आम्ही यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन वाचा फोडणार आहे, असे ते म्हणाले. ईडी, सीबीआय, आयकर विभाग तसेच अन्य शासकीय यंत्रणाचा वापर मोदी सरकार विरोधी पक्षांतील नेते तसेच त्यांच्या नातलगांना धमकावण्यासाठी करीत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. याला घाबरून जे नेते भाजपात प्रवेश करतात, त्यांच्याविरुद्धची चौकशी थांबवली जाते. हा कुठला न्याय आहे, असा सवाल खडगे यांनी केला.
खडगे म्हणाले, मला निमंत्रण मिळाले आहे!
अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामललाच्या अभिषेकाची वेळ जवळ येत असली तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही याबाबत काँग्रेस पक्ष अजूनही संभ्रमात आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याचे निमंत्रण मला मिळाले आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी आज सांगितले. काय करायचे ते मी लवकरात लवकर ठरवेन.
तत्पूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी आज काँग्रेस मुख्यालयात ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या लोगोचे लोकार्पण केले. दरम्यान, पत्रकार परिषदेत खडगे म्हणाले की, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे, मात्र याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. भारत जोडो न्याय यात्रेबद्दल खडगे यांनी सांगितले की, राहुल गांधींचा हा प्रवास 14 जानेवारीला मणिपूरच्या इंफाळ येथून सुरू होईल आणि 15 राज्यांमधून फिरून मुंबईत संपेल.