किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०६ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला. यावेळी त्यांनी समुदात डुबकी घेतली. मोदींची ही डुबकी मालदीवला फटका तर, भारतातील पर्यटन क्षेत्राला कलाटणी देणारी ठरत आहे.
मोदी यांनी ज्या लक्षद्वीप बेटावरील समुद्रकिनाऱ्यावरून समुद्राची गार हवा खाल्ली, ज्या रेतीवरून पाऊले टाकत भ्रमंती केली, ज्या लाटांचे उसळणारे पाणी अंगावर घेतले, त्या लक्षद्वीपच्या सौंदर्याने मालदीवला इर्ष्या निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदींचे लक्षद्वीप बेटावरील, समुद्र किनाऱ्यावरील फोटो समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले. विशेष म्हणजे, मोदींचे हे फोटो विदेशातील नागरिकांसाठीही चर्चेचा विषय ठरत आहेत. मोदींनी लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्याचे आवाहनही देशावासीयांना केले होते. त्यातच हा परिपाक दिसून आला आहे.
जे लोक साहसी मोहीम करू इच्छितात, त्यांच्या यादीत लक्षद्वीप असायलाच हवे. मी स्नॉर्कलिंगचा प्रयत्न केला, हा आनंदी अनुभव होता, असे मोदींनी म्हटले होते. मोदींचे हे फोटो पाहून विदेशातही लक्षद्वीप पर्यटनाची उत्सुकता वाढीस लागली आहे. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये कुठेही दुसऱ्या देशाचे नाव घेतले नाही. मात्र, भारतीय नेटीझन्सने चीनचा दोस्त असलेल्या मालदीवला लक्ष्य केले आहे. मोदींनी मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांना मोठा झटका देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सोशल मीडियात आहे. थेट नाही, पण अप्रत्यक्षपणे हा मालदीव पर्यटनासाठी झटका ठरू शकतो.