किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– हैदराबादपासून अयोध्येच्या दिशेने छल्ला श्रीनिवास शास्त्री निघाले,
हैदराबाद, (०६ जानेवारी) – प्रभू श्रीरामावरील अतूट भक्ती आणि आपल्या कारसेवक वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या इच्छेने शहरातील एका ६४ वर्षीय व्यक्तीने देवाला सोन्याचा मुलामा असलेल्या पादुका अर्पण करण्यासाठी येथून अयोध्येच्या दिशेने हजारो किलोमीटरची पायी वाटचाल सुरू केली आहे.
छल्ला श्रीनिवास शास्त्री असे या रामभक्ताचे नाव आहे. श्रीरामाने वनवासादरम्यान अवलंबलेल्या अयोध्या ते रामेश्वरम् या मार्गावरून ते उलट म्हणजे रामेश्वरम् ते अयोध्या असा प्रवास करीत आहेत. प्रभू श्रीरामांनी स्थापित केलेल्या सर्व शिवलिंगांना स्पर्श करून उलट क्रमाने प्रवास करायची इच्छा होती. त्यासाठी २० जुलैपासून हा प्रवास सुरू केला, अशे छल्ला शास्त्री यांनी सांगितले. या प्रवासात शास्त्री ओडिशातील पुरी, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर आणि गुजरातमधील द्वारका अशा अनेक ठिकाणांवरून पुढे गेले आहेत. आपण जवळपास आठ हजार किमीचे अंतर पायी पार पाडणार आहोत. डोक्यावर रामाच्या पादुका ठेवून मार्गक्रमण करीत आहे. अयोध्येत पोहोचल्यावर त्या पादुका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोपविणार असल्याचे शास्त्री यांनी सांगितले.
वनवासात प्रभू श्रीराम कुठे-कुठे गेले, याचा १५ वर्षे अभ्यास करणारे आयकर विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. रामावतार यांनी शोधलेल्या नकाशानुसार आपण अयोध्येच्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचे शास्त्री म्हणाले. माझ्या वडिलांनी अयोध्येत कारसेवा केली होती. ते हनुमानाचे निस्सिम भक्त आहेत. अयोध्येत बांधलेले राम मंदिर पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, ते आता नाहीत. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा मी निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर राम मंदिराच्या उभारणीत योगदान म्हणून मी आतापर्यंत चांदीच्या पाच विटा दिल्या. सध्या मी सोन्याचा मुलामा दिलेल्या पादुका सोबत नेत आहे. त्या श्रीरामचंद्राला अर्पण करणार आहे, असे शास्त्री यांनी सांगितले.