किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारत अधिक ताकतीने जपानसोबत उभा आहे. प्रत्येक प्रकारचे सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
जपानमध्ये भूकंपानंतर निर्माण झालेल्या स्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी जपानचे आपले समकक्ष फुमियो किशिदा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. आपला देश जपानच्या कठीण काळात ताकतीने उभा आहे. भारत भूकंपपीडितांना प्रत्येक प्रकारची मदत करण्यास तयार आहे. कारण, आपल्या देशाने सातत्याने अनेक वर्षांपासून जपानसोबतच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे, असे पंतप्रधान मोदींनी पत्रात नमूद केले. यावेळी त्यांनी आपण देशवासीयांच्या वतीने भूकंपातील मृतांप्रती संवेदना व्यक्त करीत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, जपानमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात आतापर्यंत ७३ लोकांनी जीव गमावला आहे. ७.६ इतक्या तीव्रतेच्या धक्क्याने वाजिमा शहरातील २५ इमारती उद्ध्वस्त झाल्या. लोकप्रिय पर्यटनस्थळ असआईची स्ट्रीटजवळील दुकाने आणि घरांसह एकूण २०० इमारतींना आग लागली. अमेरिकन भूगर्भशास्त्र सर्वेक्षणानुसार, भूकंपाचे केंद्र इशिवाका प्रांतातील नोटो बेटावर १० किलोमीटर खोलीवर होते. दरम्यान, भूकंपग्रस्त भागातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाल्याने मदतकार्यात अडथळे येत आहे. पंतप्रधान किशिदा यांनी आपत्कालीन बैठकीत मतदकार्यासंदर्भात माहिती दिली.