किमान तापमान : 28.15° से.
कमाल तापमान : 28.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.71° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल26.75°से. - 30.84°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 30.31°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.46°से. - 30.28°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.42°से. - 29.88°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– सर्वोच्च न्यायालयाचा आदेश,
नवी दिल्ली, (१३ मार्च) – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात असलेली मशीद तीन महिन्यांत हटवा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी प्रशासनाला दिला. ही मशीद संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यावरील संपत्तीवर उभी आहे. तुम्ही हक्क पुढे सुरू ठेवू शकणार नाहीत, असे या मशिदीला पाडण्यास विरोध करणार्या याचिकाकर्त्याला न्यायालयाने सांगितले.
न्यायालय परिसरातून तीन महिन्यांत ही मशीद हटवण्यात यावी, असा आदेश अलाहबाद उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१७ मध्ये दिला होता. याचिकाकर्ते वक्फ मशीद हायकोर्ट आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ही याचिका फेटाळली. मात्र, मशीद उभारण्यासाठी जवळच जमीन देण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारला निवेदन सादर करण्याची परवानगी न्या. एम. आर. शाह आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या न्यायासनाने याचिकाकर्त्यांना दिली.
ही जमीन एक भाडतत्त्वावरील संपत्ती असून, त्याचा करार संपुष्टात आला आहे आणि तो हक्क कायम राहावा, यासाठी याचिकाकर्ते दावा करू शकत नाहीत, असे न्यायासनाने स्पष्ट केले. हे बांधकाम हटवण्यासाठी आम्ही तीन महिन्यांची मुदत देत आहोत. परंतु, ते आजपासून तीन महिन्यांत हटवण्यात आले नाही तर, ते हटवावे किंवा पाडावे, हे प्रशासन अथवा उच्च न्यायालयावर असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.