किमान तापमान : 28.7° से.
कमाल तापमान : 28.89° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.99 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.89° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल-सर्वोच्च न्यायालयाचा संरक्षण मंत्रालयाला आदेश,
नवी दिल्ली, (१३ मार्च) – संरक्षण मंत्रालयाने २० जानेवारी रोजी दिलेल्या वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) चार हप्त्यात देण्याचा आदेश तत्काळ परत घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिला. देशाचे संरक्षण मंत्रालय कायदा आपल्या हाती घेऊ शकत नाही. सर्वांत अगोदर ज्येष्ठांना निधी वितरित करावा.
केंद्र सरकारच्या वतीने अटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी म्हटले की, केंद्र सरकारने माजी सैनिकांना ओआरओपीची रक्कम एकाच हप्त्यात दिली आहे. परंतु, पुढील प्रक्रियांसाठी काही मुदतीची गरज आहे. सरकारच्या या बाजूवर न्यायालय म्हणाले की, सर्वांत आधी ओआरओपीच्या उर्वरित रकमेबाबत २० जानेवारीची अधिसूचना परत घ्यावी. त्यानंतरच अधिक मुदतीसंदर्भात आपल्या अर्जावर विचार करण्यात येईल. यावेळी खंडपीठाने संरक्षण मंत्रालयाचा निर्णय पूर्णपणे विसंगत स्थितीत होता, असा टोलाही मारला तसेच सदर रक्कम, वितरणाची प्रक्रिया आदींबाबत सविस्तर माहिती तयार करण्याची सूचना केली. सदर योजनेतील वृद्धांना सर्वांत प्रथम वितरण व्हावे. कारण हे प्रकरण न्यायालयात आल्याच्या सुनावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत चार लाखांपेक्षा अधिक पेन्शनरांचा मृत्यू झाल्याचीही खंत व्यक्त केली.