किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१३ मार्च) – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या टप्प्यात दोन्ही सभागृहांतील कामकाजाबाबत विरोधी पक्षांची व्यूहरचना ठरविण्यासाठी काँग्रेसच्या पुढाकाराने सोमवारी सकाळी १६ विरोधी पक्षांची बैठक झाली. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्या संसदभवनातील दालनात झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, भाकप, माकप, जदयू, द्रमुक, राजद, आम आदमी पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस, राष्ट्रीय लोकदल, एमडीएमके, आरएसपी, आययुएमएल या पक्षांचे नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेस मात्र या बैठकीत सहभागी झाली नाही.
विरोधी पक्ष नेत्यांच्या निवासस्थानी सीबीआय, ईडी तसेच अन्य यंत्रणा सुडबुद्धीने जी कारवाई करीत आहे, तो मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहांत उपस्थित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे अदानी मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचा तसेच या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी संसदेत प्रभावीपणे रेटण्यावरही या बैठकीत एकमत झाले. विविध मुद्यांवरून सरकारला घेरण्याच्या मुद्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
दोन्ही सभागृहांतील काँग्रेस खासदारांची बैठक
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असताना संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाजाबाबत व्यूहरचना ठरवण्यासाठी आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहांतील काँग्रेसच्या खासदारांची बैठक झाली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्या संसदभवनातील कार्यालयात झालेल्या या बैठकीला लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यासह दोन्ही सभागृहातील काँग्रेसचे सदस्य उपस्थित होते.
जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेस पक्षला सरकारला त्याच्या जबाबदारीची जाणिव करून देईल तसेच ज्वलंत मुद्यावर सभागृहात चर्चेची मागणी करेल, यासाठी आम्ही सरकारवर दबाब आणू, असे खडगे म्हणाले.