किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०४ डिसेंबर) – भारतातील सिमेंट उद्योगात अल्ट्राटेक सिमेंटचे नाव आघाडीवर आहे. आता ही कंपनी जगातील तिसरी सर्वांत मोठी सिमेंट कंपनी बनली आहे. कंपनीने केसोराम उद्योगाचा सिमेंट व्यवसाय विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुमार मंगलम् बिर्ला यांच्या कंपनीने यासाठी ७,६०० कोटी रुपयांचा सौदा केला आहे. या करारामुळे कुमार मंगलम् बिर्ला आता अदानीच्या सिमेंट व्यवसायाला तगडी स्पर्धा देणार आहेत.
एव्ही बिर्ला ग्रुपची सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंट, बीके बिर्ला ग्रुपच्या केसोराम इंडस्ट्रीजचा सिमेंट व्यवसाय शेअर स्वॅप डीलमध्ये विकत घेईल. केसोराम इंडस्ट्रीजचे एकूण मूल्यांकन कर्जासह, सुमारे ७६०० कोटी रुपये आहे. केसोराम यांनी शेअर बाजाराला सांगितले की, त्यांच्या मंडळाने शेअर स्वॅपद्वारे सिमेंट व्यवसाय विक्रीला मंजुरी दिली आहे. केसोरामच्या ५२ शेअर्ससाठी अल्ट्राटेक सिमेंटचा एक शेअर त्यांच्या शेअर धारकांना मिळेल.
विशेष म्हणजे, हा सौदा बिर्ला कुटुंबातच झाला आहे. बीके बिर्ला यांचे नातू कुमार मंगलम् बिर्ला अल्ट्राटेकचे मालक असलेल्या एव्ही बिर्ला समूहाचे प्रमुख आहेत. अल्ट्राटेक ही चीनबाहेर जगातील तिसरी सर्वांत मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे, ज्याची एकूण क्षमता १३७.८ मिलियन टन आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे त्याची क्षमता १६० दशलक्ष टन होईल.