किमान तापमान : 26.11° से.
कमाल तापमान : 26.34° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 3.56 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.11° से.
24.19°से. - 28.59°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.97°से. - 28.98°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.68°से. - 27.91°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.13°से. - 27.83°से.
रविवार, 01 डिसेंबर साफ आकाश24.24°से. - 27.59°से.
सोमवार, 02 डिसेंबर घनघोर बादल24.18°से. - 26.91°से.
मंगळवार, 03 डिसेंबर टूटे हुए बादलमुंबई, (१७ नोव्हेंबर) – बँका आणि गैर-बँकिग वित्तीय संस्थांकडून दिल्या असुरक्षित वैयक्तिक कर्जाबाबतचे नियम भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी कठोर केले आहेत. सुधारित निकषात जोखीम भार २५ टक्के गुणांनी वाढवला असून, हे नियम गृहनिर्माण, शिक्षण आणि वाहन कर्जासह काही ग्राहक कर्जांवर लागू होणार नाही.
सोने कींवा सोन्याचे दागिने तारण ठेवून घेतलेल्या सुरक्षित कर्जासाठीही हे निकष लागू होणार नाहीत. ही कर्जे १०० टक्के जोखीम भाराची असतील. उच्च जोखीम भाराचा अर्थ असा होतो की, असुरक्षित वैयक्तिक कर्जाचा प्रश्न येतो, तेव्हा बँकांना बफर म्हणून अधिक पैसे बाजूला ठेवावे लागतात. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, उच्च जोखीम भार बँकांच्या कर्ज देण्याची क्षमता मर्यादित करते. ग्राहक कर्जांच्या काही घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलिकडेच सांगितले होते. बँका आणि गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांना त्यांच्या नजर ठेवणा-या अंतर्गत यंत्रणा मजबूत करण्यासाठी जोखमीच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये योग्य सुरक्षा उपायांचा सल्ला दास यांनी दिला होता.