किमान तापमान : 29.81° से.
कमाल तापमान : 29.93° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.93° से.
27.3°से. - 30°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– स्नेहांचलच्या कार्याचे केले कौतुक,
नागपूर, (०७ सप्टेंबर) – सेवा करताना कुणाच्याही मनात अहंकार येऊ नये. कारण ज्याची सेवा करतो, त्यांचे केवळ कल्याण करण्याचा हा प्रयास नसून सेवा करत असताना आपणही पवित्र होऊन जातो. म्हणूनच जेव्हा केव्हा अहंकार येतो, तेव्हा ती सेवा ठरत नसते. ती दया होते. आपण दया देत नाही तर सेवा करतो. अगदी अशीच पवित्र भावना जपत मरणप्राय यातना भोगणार्या कर्करुग्णांसाठी स्नेहांचलचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे, ही नक्कीच कौतुकास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काढले. इमामवाडा परिसरातील स्नेहांचल उपशमन केंद्राला गुरुवार ७ सप्टेंबर २०२३ रोजी सरसंघचालकांनी भेट देऊन पहाणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णांचे नातेवाईक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व दानदात्यांना मार्गदर्शन केले.
जन्म घेतला म्हणजे क्लेश येतोच. पण, मनुष्य कष्टाकडे लक्ष देत नाही. तो पुढे जात असतो. दुःखाचे, क्लेशाचे हरण कृष्ण करतो. तेच कार्य कलियुगात स्नेहांचल प्रत्यक्षात करीत असल्याचे डॉ. मोहनजी भागवत यांनी स्पष्ट केले. इतर देशातील सेवेत दया, करुणा आहे. भारतीय परंपरेतील सेवेत आपलेपणा आहे. सेवा करताना आपल्याही दुःखाचे उपशमन होते. यातूनच आपण चांगला माणूस झालो, असेही समाधान प्राप्त होते. अगदी याच स्वरूपातील भावनेतून स्नेहांचलचे कार्य चालते व हीच तर भारतीय सेवा वृत्ती आहे. स्नेहांचलचे असे काम पाहून इतरांचाही उत्साह वाढतो, ऊर्जा मिळते. सेवा कशी करायला हवी, याचा स्नेहांचल हे आदर्श उदाहरण म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, असेही डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
प्रारंभी डॉ. मोहनजी भागवत यांनी स्नेहांचलच्या वार्डात फिरून रुग्णांशी संवाद साधला. परिसरात वृक्षारोपण केले. डॉक्टर व परिचारिकांनी दोन जनजागृतीपर पथनाट्य सादर केली. स्नेहांचल ट्रस्टचे अध्यक्ष जिमी राणा, डॉ. प्रबोध यांनी स्नेहांचलच्या कार्याचा उद्देश स्पष्ट केला. नवीन देशपांडे यांनी संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. संचालन सपना काळे, तर उपस्थितांचे आभार इंद्राणी पवार यांनी मानले. नॅशनल कँसर इन्स्टिट्यूटचे सीईओ शैलेश जोगळेकर, मेडिकलचे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. अशोक दिवाण, प्रा. डॉ. विजय मोहबिया, राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कर्तारसिंह, कँसर रिलिफ सोसायटीचे अशोक कृपलानी, अनिल मालवीय प्रामुख्याने उपस्थित होते.