किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०७ सप्टेंबर) – जी-२० देशांच्या ९ आणि १० सप्टेंबरला होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजधानी नववधुसारखी सजवण्यात आली असून, अतिमहत्त्वाच्या किमान दोन डझनांवर देशांच्या पाहुण्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे.
प्रगती मैदान परिसरातील अत्याधुनिक भारत मंडपम् कन्व्हेंशन सेंटरमध्ये ही परिषद होणार आहे. २० देशांचे राष्ट्रप्रमुख तसेच सरकारप्रमुख या परिषदेत सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युएल मैक‘ाँ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज, जपानचे पंतप्रधान फिमियो किशिदो यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख तसेच सरकारप्रमुख या परिषदेसाठी शुक‘वारी दिल्लीत डेरेदाखल होत आहे. जी-२० मध्ये चीन, फ्रान्स, भारत, ब्रिटन, इटली, जर्मनी, जपान, कॅनडा, रशिया, ब्राझील, तुर्किए, कोरिया, मेक्सिको, अमेरिका, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, दक्षिण ऑफि‘का, सौदी अरब आणि युरोपियन युनियन आदी देशांचा समावेश आहे.
युरोपीयन युनियनमध्ये २७ सदस्य आहे.
जी-२० र्ीीााळीं जी-२० चे सदस्य नसलेल्या स्पेन, ओमान, इजिप्त, सिंगापूर, मॉरिशस, नेदरलॅण्ड, बांगला देश, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिरात या देशांनांही या शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान अल सौद या परिषदेत सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या भारतभेटीला सौदी अरबकडून अद्याप दुजोरा मिळू शकला नाही.
बायडेन-मोदींमध्ये द्विपक्षीय बैठक
ज्यो बायडेन शुक‘वारी नवी दिल्लीत दाखल होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांची त्याच दिवशी द्विपक्षीय बैठकही होणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या परिषदेत सहभागी होणार नाहीत, त्याऐवजी चीनच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व पंतप्रधान ली कियांग करणार आहेत. २००८ नंतर पहिल्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष जी-२० देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाही. याआधी २०२० आणि २१ मध्ये ते जी-२० परिषदेला आभासी पद्धतीने ते उपस्थित राहिले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनही या परिषदेला उपस्थित राहणार नाही. परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह रशियाच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत.