किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, २ जानेवारी – देशात पुढील काही दिवसांमध्ये दोन ते तीन कोरोना लसींना मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. वेगात लस येणे हाच आपल्या वैज्ञानिक प्रगतीचा ठाम पुरावा म्हणता येईल. मात्र, लस आली की रोग दूर होईल, असे समजता येणार नाही. हा रोग आपल्यासोबत राहणार असल्याने काळजी घेत राहणे, हेच आपल्या हाती असल्याचे मत सीएसआयआर अर्थात केंद्रीय विज्ञान संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
लसीमुळे कोरोनाचे पूर्णपणे निर्मूलन होईल का, याबाबत निश्चित सांगता येणार नाही. देवी रोगासारखा अनुभव आताही येईल का, हे सुद्धा अद्याप अनिश्चित आहे. तरीही लसीकरणाच्या बाबतीत आपण मागे राहिलो आहे, असे म्हणता येणार नाही. बाकी देशांमध्ये १५ दिवसांपूर्वी परवानग्या सुरू झाल्या आहेत, असे डॉ. मांडे म्हणाले.
देशात ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. यानंतरच्या काळात वेगाने लस येत आहे. मागील वर्षभराच्या काळात जिनोम, व्हेंटिलेटर्स तयार करण्यात आले. स्वस्त चाचणी सुविधा (टेस्टिंग किट), आपत्कालीन रुग्णालये (इमर्जन्सी हॉस्पिटल्स) तयार केले आहेत. आता सर्व लसी पहिल्या टप्प्यातून बाहेर आल्या आहेत. त्यात लसीच्या सुरक्षेबद्दल कडक चाचणी होत असल्यामुळे कुणीही भीती बाळगू नये, अशा शब्दांत डॉ. मांडे यांनी आश्वस्त केले. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. ब्रिटन आणि अर्जेंटिनानंतर ऑक्सफोर्ड लसीला मान्यता देणारा भारत तिसरा देश असल्याचेही ते म्हणाले.