किमान तापमान : 28.05° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.05° से.
27.95°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१६ फेब्रुवारी ) – माता वैष्णोदेवी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी रोप-वेची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्रिकुटा पर्वतावरील मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ ५ ते ६ तासांवरून ६ मिनिटांवर येईल. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २.४ किमी लांबीच्या रोपवेसाठी रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेडने निविदा मागवल्या आहेत. विशेष म्हणजे माता वैष्णोदेवीचे मंदिर सुमारे ५२०० फूट उंचीवर आहे. कटरा बेस कॅम्पजवळील तारकोट येथून हा प्रकल्प सुरू होईल, जो सांजीछतपर्यंत जाईल. रोपवेमध्ये गोंडोला केबल कारची व्यवस्था असेल.
दोन वर्षांपूर्वी माता वैष्णोदेवी मंदिर ते त्रिकुटा डोंगरातील भैरो मंदिरापर्यंत रोपवे सुरू करण्यात आला. सध्या, वैष्णो देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी एकच मार्ग आहे, ज्यामध्ये १२ किमीचा ट्रेक समाविष्ट आहे. याशिवाय कटरा ते सांजीछट या हेलिकॉप्टरच्या सुविधेचाही भाविक लाभ घेऊ शकतात. आता रोपवे सुविधेनंतर मंदिरापर्यंत सहज आणि कमी खर्चात पोहोचणे शक्य होणार आहे.