किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.97°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-बर्फात खेळण्याचा व्हिडीओ,
गुलमर्ग, (१६ फेब्रुवारी ) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच भारत जोडो यात्रा संपली. त्याचा समारोप त्यांनी जम्मू-काश्मिरातील श्रीनगरमध्ये केला. त्यावेळी त्यांनी त्यांची बहीण प्रियांका वढेरा हिच्यासोबत बर्फ खेळण्याचा आनंद लुटला होता. त्यानंतर त्यांनी संसदेच्या कामकाजात भाग घेतला आणि भाषण केले. आता मात्र राहुल गांधी दोन दिवसांच्या खाजगी दौर्यावर काश्मीरला आले आहेत. तेथे त्यांनी स्की स्लोपचा आनंद लुटला.
राहुल गांधी यांनी बुधवारी उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे स्कीईंगचा आनंद लुटला. तेथे त्यांनी गोंडोले केबल कार चालवली. तसेच फिरायला आलेल्या अनेक पर्यटकांसोबत फोटोदेखील काढले. त्यावेळी राहुल गांधी यांच्या सुरक्षा कर्मचार्यांना अडचणींचा सामना करावा लागला. राहुल गांधी यांनी नुकतीच ३९७० किमीची भारत जोडो पदयात्रा केली. ही यात्रा ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली होती. तब्बल पाच महिने ही यात्रा होती. १२ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतून फिरून ३० जानेवारी २०२३ रोजी श्रीनगर येथे या यात्रेची सांगता झाली. राहुल गांधी यांनी हिमवादळात भाषण केले होते. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर लगेच काही दिवसांत ते आपली सुटी साजरी करण्यासाठी आले आहेत.