किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (१४ डिसेंबर) – संसद सुरक्षा उल्लंघन प्रकरणातील फरार आरोपी ललित झा राजस्थानातील निमराना येथे असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे. आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून, यात एका दाम्पत्याची चौकशी करण्यात येत आहे.
सूत्रांनुसार, संबंधित आरोपी आतापर्यंत कोणत्याही संघटनेसोबत जुळले असल्याची माहिती समोर आलेली नाही. सागर शर्मा आणि मनोरंजनने संसद भवनात जाण्यासाठी पासेसची व्यवस्था केली होती. ते सर्व समाज माध्यमातील भगत सिंग फॅन क्लबच्या संपर्कात होते. याशिवाय ते दीड वर्षाआधी म्हैसूर येथे एकत्र आले होते. बुधवारी कट अंमलात आणण्यासाठी सागर हा मागील जुलै महिन्यात लखनौ येथून दिल्लीत आला होता. अन्य आरोपी आपापल्या राज्यातून १० डिसेंबर रोजी दिल्लीत पोहोचले. इंडिया गेटजवळ एकत्र येत रंगीत फटाक्याचे वाटप करण्यात आले. घटनेच्या दिवशी अतिशय गुप्त पद्धतीने आपत्तीजनक वस्तू संसदभवनात नेण्यात आल्या.