किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29.09° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संदेश,
केवडिया, ३१ ऑक्टोबर – कोणत्याही देशांतर्गत किंवा बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी देश सक्षम होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी केले. ऐक्य असलेला देशच प्रगती करू शकतो आणि निर्धारित उद्दिष्टे गाठू शकतो, असे त्यांनी सांगितले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त आभासी स्वरुपात दिलेल्या संदेशात ते म्हणाले, जमीन, हवा किंवा पाणी असो, देशाच्या पहिल्या गृहमंत्र्यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन देशाची क्षमता आणि संकल्प आता प्रत्येक आघाडीवर अभूतपूर्व आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाचे विविध भाग संघराज्यात विलीन केले होते. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याला आदरांजली म्हणून त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरकसपणे ऐक्याचे आवाहन केले.
नौकेत बसलेल्या प्रत्येकाला नौकेची काळजी असते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्यात ऐक्य असेल, तरच आपण प्रगती करू शकू तसेच ऐक्य भावना जोपासल्यास देश निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करू शकेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सामूहिक प्रयत्न अधिक समर्पक आहेत, असे सांगताना मोदी यांनी सरदार पटेल यांच्या ‘सामान्य प्रयत्नाने आपण देशाला महानतेच्या दिशेने नेऊ शकतो, तर ऐक्याचा अभावामुळे आपल्याला संकटांना सामोरे जावे लागेल,’ या वक्तव्याचा हवाला दिला.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अखंडतेचा संदेश देणारे प्रतीक ः अमित शाह
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा पुतळा भारताच्या ऐक्याचे प्रतीक असून भारताची एकता, अखंडता कोणीही भंग करू शकत नाही, असा संदेश जगाला देत आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी आज रविवारी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांची रविवारी जयंती असल्याने गृहमंत्री गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील सरदार पटेलांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यास आले होते. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आहेत. या पृष्ठभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. यामुळे यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाला अधिक झळाळी आली आहे आणि आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी भारताचे अनेक तुकडे करण्याचा प्रयत्न केला. पण, ब्रिटिशांचा हा कट सरदार पटेल यांनी उधळून लावला आणि अखंड भारतासाठी लढले.
केवडिया हे फक्त एका ठिकाणाचे नाव नाही तर, राष्ट्रीय एकात्मतेचे श्रद्धास्थान आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा आकाशाला उंच भिडणारा पुतळा हा भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा संदेश जगाला देत आहे. भारताची एकता आणि अखंडतेला कुणीही ठेच पोहोचवू शकत नाही, असा संदेशही जगाला दिला गेला आहे. शतकानुशतके एकच सरदार होऊ शकतो. तो एक सरदार शतकानुशतके प्रेरणा बनतो, असे शाह म्हणाले.
पटेल यांचा विसर पडण्यासाठी प्रयत्न
स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचा विसर पडावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. त्यांच्या योगदानाचा आदर केला गेला नाही. त्यांना भारतरत्नही दिला नाही आणि त्यांचा सन्मानही केला गेला नाही. पण, परिस्थिती बदलली. भारतरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेला आणि आता जगातील सर्वांत उंच त्यांचा पुतळा आपल्याला दिसत आहे, असे स्पष्ट करीत अमित शाह यांनी कॉंग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली.