किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.19° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.45°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलअतिरेक्यांसोबत केली घुसखोरीची योजना,
श्रीनगर, १ नोव्हेंबर – पाकिस्तानची पाताळयंत्री गुप्तचर संस्था आयएसआयने भारताच्या विरोधात रचलेल्या कटाचा खुलासा झाला आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल्-बद्र संघटनेच्या अतिरेक्यांसोबत व्याप्त काश्मीरमध्ये आयएसआयने बैठक घेतली. बर्फवृष्टी सुरू होण्यापूर्वी खोर्यात मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याची योजना या बैठकीत तयार करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बर्फवृष्टीपूर्वी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची घुसखोरी करण्याचा कट आयएसआयने रचला आहे. नियंत्रण रेषेजवळील मार्गांवरून अतिरेक्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न वाढू शकतात. बर्फवृष्टी झाल्यावर हे मार्ग कित्येक महिने बंद होतात, म्हणून या कटाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची इच्छा आयएसआयची आहे. नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी शिबिरांमध्ये २०० ते २५० अतिरेकी असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लष्कर, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) सतर्क झाली असून, या संस्था नियंत्रण रेषेवर बारीक नजर ठेवून आहेत. सहा अतिरेक्यांचा समावेश असलेल्या एका पथकाने मागील महिन्यात जम्मूतील राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून काश्मीर खोर्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती संरक्षण यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. नियंत्रण रेषेवरून जम्मूत दाखल होत काश्मीर खोर्यात घुसखोरी करण्याची योजना अतिरेक्यांच्या या गटाने तयार केली होती. त्यानंतर लष्कराच्या घुसखोरी आणि दहशतवादविरोधी तुकडीने राजौरी आणि पूंछमध्ये शोधमोहीम सुरू केली. या अतिरेक्यांनी नियंत्रण रेषेवरून पुन्हा व्याप्त काश्मिरात पळ काढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील महिन्यात ९ जवान हुतात्मा
पूंछ येथील डेरा की गली येथे ११ ऑक्टोबर रोजी अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत ५ जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर तीन दिवसांनी मेंढर येथे झालेल्या चकमकीत ४ जवान हुतात्मा झाले.