किमान तापमान : 28.15° से.
कमाल तापमान : 28.71° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.71° से.
27.47°से. - 31.2°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल26.75°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 30.31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.46°से. - 30.28°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.42°से. - 29.88°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.64°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, १ नोव्हेंबर – वस्तू व सेवा कर अर्थात् जीएसटीच्या संकलनात मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, १ जुलै १०२७ रोजी जीएसटीची अंमलबजावणी झाल्यापासूनचे हे दुसरे सर्वोच्च संकलन आहे.
कोरोनातून अर्थव्यवस्था आता सावरत असल्याचे आणि सणांच्या काळात मागणी वाढल्याचे दिसून येत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज सोमवारी निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये १.४१ लाख कोटी रुपयांचे सर्वोच्च संकलन झाले होते. सलग चार महिन्यांपासून जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. सप्टेंबरमध्ये १.१७ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात सोने विक्री आणि सेवेवर २४ टक्के जास्त महसूल प्राप्त झाला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे जीएसटी संकलन ३६ टक्के जास्त आहे.
ऑक्टोबरमध्ये १,३०,१२७ कोटी रुपयांचे एकूण जीएसटी संकलन करण्यात आले. यात केंद्रीय जीसएसडी २३,८६१, तर ३०,४२१ कोटी रुपयांचे राज्यातील जीएसटीचे संकलन करण्यात आले. या महिन्यात ६७,३६१ कोटी रुपयांचे एकीकृत जीएसटी संकलन झाले. यात आयात निर्यातीवरील ३२,९९८ कोटी रुपयांच्या करसंकलनाचा समावेश आहे. सेसमधून ८,४८४ कोटींचा महसूल प्राप्त झाला, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.