किमान तापमान : 27.64° से.
कमाल तापमान : 28.54° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.17 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.54° से.
27.79°से. - 31.2°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल26.75°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 30.31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.46°से. - 30.28°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.42°से. - 29.88°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.64°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलन्या. चंद्रचूड यांची टिप्पणी,
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर – डाबर कंपनीने काही दिवसांपूर्वी करवा चौथची केलेली एक जाहिरात मागे घ्यावी लागली. यात समलिंगी दाम्पत्य करवा चौथ साजरा करत असल्याचे दाखवण्यात आले होते. ही जाहिरात सार्वजनिक असहिष्णुतेमुळे मागे घ्यावी लागल्याची टिप्पणी न्या. धनंजय चंद्रचूड यांनी केली आहे.
सामाजिक असमानता नष्ट करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले कायदे आणि समाजातील परिस्थिती यात बरीच दरी असल्याचे मत व्यक्त करताना, त्यांनी हे उदाहरण दिले. ‘कायदेशीर जागृतीद्वारे महिला सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. नालसा आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेशीर जागृती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला न्या. चंद्रचूड उपस्थित होते.
न्या. चंद्रचूड म्हणाले, आपले संविधान काळानुरूप बदलणारे आहे. यात पितृसत्ताक पद्धतीमध्ये असणारी असमानता दूर करण्यासाठीचे उपाय दिले आहेत. महिलांच्या घटनात्मक अधिकारांची पूर्तता करण्यासाठी घरगुती हिंसाचार कायदा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा यासारखे कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करताना महिलांवर अन्याय करणारी बरीच प्रकरणे आमच्यासमोर येतात. सामाजिक असमानता नष्ट करण्यासाठी बनवलेले कायदे आणि समाजाची सध्याची परिस्थिती यामध्ये एक मोठी दरी आहे, हे त्यातून दिसून येते.
आम्ही अशी बरीच प्रकरणे पाहिली आहेत जिथे कायदाही महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी थिटा पडतो. एका महिलेला कंपनीने मातृत्व रजा नाकारली. कारण तिच्या पतीला पहिल्या पत्नीपासून झालेली दोन मुले घरात होती. तिचे पहिलेच मूल असले तरी तिला तिचा हक्क मिळाला नाही. कित्येकदा घटस्फोटानंतर तिला पोटगी नाकारली जाते. नवरा नोकरीत नाही किंवा घरातील उद्योगात तो मालक नाही, असे दाखवून तिला पोटगी नाकारली जाते, अशी अनेक उदाहरणेही न्या. चंद्रचूड यांनी दिली.