किमान तापमान : 28° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 3.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28° से.
27.88°से. - 30.83°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.1°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलपोटनिवडणुकांचे निकाल जाहीर,
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर – देशात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या २९ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज मंगळवारी जाहीर झाले. मध्यप्रदेशमधील खांडवा, दादरा नगर-हवेली तसेच हिमाचल प्रदेशातील मंडी अशा तीन लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका चांगल्याच चुरशीच्या ठरल्या. यात तिन्ही जागांवर तीन वेगवेगळ्या पक्षांनी विजय मिळवला आहे. तसेच विधासनभेत स्थानिक प्रबळ पक्षांचीच सरशी दिसून आली.
एका दृष्टिक्षेपात पोटनिवडणूक निकाल पाहायचे झाल्यास लोकसभेच्या जागांपैकी एक भाजपा, एक कॉंग्रेस आणि उर्वरित एक जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. २९ विधानसभा जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्वाधिक १३, कॉंग्रेसला ८ तर इतर पक्षांना ८ जागा मिळाल्या.
मध्यप्रदेशच्या खंडवा या जागेवर भाजपाने विजय मिळवला. भाजपाकडून ज्ञानेश्वर पाटील यांनी ही निवडणूक लढवली. तर कॉंग्रेसचे उमेदवार राजनारायण मैदानात होते. दादरा नगर-हवेली या जागेवर शिवसेनेने भगवा फडकवला. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेकर या विजयी झाल्या आहेत. त्यांना १ लाख १६ हजार ८३४ तर भाजपाचे महेश गावित यांना ६६,१५७ मते मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपा उमेदवाराचा ५०,६७७ मतांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या प्रतिभासिंह विजयी झाल्या.
नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांचा पराभव केला.
राजस्थानमधील धरियावद विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार नगराज मीणा यांचा विजय झाला आहे. वल्लभनगर जागेवर कॉंग्रेस उमेदवार प्रीति सिंह शक्तावत विजयी झाल्या.
बिहारमधील कुशेश्वरस्थान विधानसभेची जागा जदयूने १२,६९५ मतांनी जिंकली. मेघालयात भाजपाचा मित्रपक्ष असलेला एनपीपी नॅशनल पीपल्स पार्टीचा उमेदवारही राजबाला मतदारसंघातून विजयी झाला आहे. कर्नाटकातील विधानसभेच्या दोन जागांपैकी एक जागा भाजपाने तर दुसरी जागा कॉंग्रेसने जिंकली.
आसामच्या पाचही जागांवर भाजपा
आसाममधील विधानसभा पोटनिवडणुकीच्या पाचही जागांवर भाजपा नेतृत्वातील रालोआने विजयाची पताका फडकवली. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या चार जागांवर तृणमृण कॉंग्रेसने विजय मिळविला.